वेंगुर्ला येथे भाजपाची भव्य रॅली

वेंगुर्ला येथे भाजपाची भव्य रॅली

 

वेंगुर्ला

 

    मंगळवारी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने  भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातून भव्य मोटारसायकल  रॅली काढण्यात आली.यास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
        वेंगुर्ला एस. टी. स्टॅन्ड, श्री देव रामेश्वर मंदिर स्टॉप, कॅम्प, हॉस्पिटल नाका, भटवाडी, बाजारपेठ ते भाजपा कार्यालयपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, सर्व उमेदवार, शहरासह तालुक्यातील सर्व भागतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजारोच्या संख्येने दाखल झाले होते. दरम्यान पोलीस यंत्रणेमार्फत बाजारपेठेसह सर्व नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्तद्वारे ट्राफिक सुरळीत करण्यासाठी क्रियाशील होते.