वीज ग्राहकांच्या समस्या सोडविणे वीज विभागाचे कर्तव्य : जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर. साटेली-भेडशी येथे वीज ग्राहक बैठक संपन्न.

दोडामार्ग.
वीज ग्राहकांच्या समस्या सोडविणे ही आपली जबाबदारी आहे.फक्त वाढीव वीज बीलच नव्हे तर आपल्या संकेतस्थळावरील लिखित स्वरूपातील अनेक समस्या साटेली-भेडशी विभागात असुन आपण त्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे अशी रोखठोक भूमिका जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी साटेली-भेडशी दशक्रोशीतील ग्राहकांच्या वतीने साटेली-भेडशी वीज कार्यालयात मांडली.
दामोदर सभागृह भेडशी खालचा बाजार येथे वीज ग्राहक संघटना दोडामार्ग, व्यापारी संघटना व जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत वीज विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिले नाही. माञ उपस्थित वीज ग्राहकांनी बैठकीत आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर साटेली-भेडशी वीज कार्यालयात थेट ग्राहकांसह समस्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी उपस्थित ग्राहक संदेश मणेरीकर-भेडशी, स्वप्निल गवस-खोक्रल, भरत गवस-बोडदे, दशरथ नाईक-भेडशी, चंद्रावती गवस - खोक्रल यांच्या वाढीव वीज बीलाबाबत व्यथा मांडण्यात आल्या.यावेळी संदेश सावंत व सतिश जंगले बिलिंग विभाग यांनी समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. दशक्रोशीतील वीज समस्या सोडविणे गरजेचे असुन आपण पावसाळ्यापूर्वी येथील ग्राहकांच्या समस्या सोडवा असे उपस्थित अधिका-यांना सांगण्यात आले.यावेळी साटेली-भेडशी विभागातील समस्या सोडविण्यात येतील अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
यावेळी वीज-ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटेकर, समन्वय सदस्य गणेश बोर्डेकर, सावंतवाडी अध्यक्ष संजय लाड, दोडामार्ग अध्यक्ष सुभाष दळवी, सहसचिव भूषण सावंत, सदस्य ज्ञानेश मोरजकर, सिद्धेश केसरकर, नंदकिशोर टोपले, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, पञकार गोविंद शिरसाट, सोनू गवस, विठ्ठल घोटगेकर, संजय कदम, संदिप टोपले, गौरोव वेटे, मिथुन बेळेकर, स्वप्निल गवस, अजित धर्णे, संकेत कुबडे, संतोष आजगावकर, नमिता पार्सेकर, मंगेश शिरसाट, भरत गवस, कृष्णा मोरजकर, संदेश मणेरकर, उदय गोलम, रविकिरण बोंद्रे, राजदत्त वेटे, उदय बुडकुले, प्रसाद बोंद्रे, उदय सरवणकर आदी वीज ग्राहक उपस्थित होते.