डंपरची विजेच्या खांबाला धडक

सावंतवाडी
सावंतवाडी येथील बांदा-निमजगा परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने विजेच्या पोलला धडक दिल्याने विजेच्या तारा रस्त्यावर कोसळल्यात. यात वीजवाहिन्यात अडकून तब्बल ६ गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने गाड्या तशाच टाकून अनेकांनी पळापळ काढल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. जोपर्यंत संबंधितावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. दाणोली येथून बांद्याच्या दिशेने जाणाऱ्या एका टिप्परने निमजगा परिसरातील केशव ऑटो सेंटरच्या समोर असलेला विजेच्या खांबाला धडक दिली. त्यामुळे खांबावर असलेल्या वीज वाहिनी तुटून बाजूला असलेल्या वाहन चालकावर व गाड्यावर कोसळल्या. यातील वीजवाहीन्यात अनेक गाड्या अडकल्या. त्यामुळे सहा गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने हा प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणी गाड्यावर असलेली लहान मुले तसेच दुचाकी चालकांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या सर्व प्रकारानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.