वायंगणी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय....निराधारांसाठी घरपट्टी व स्मशानभूमी शुल्क पूर्णतः माफ

वायंगणी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय....निराधारांसाठी घरपट्टी व स्मशानभूमी शुल्क पूर्णतः माफ

वेंगुर्ला


    वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावातील निराधार नागरिकांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय वायंगणी ग्रामपंचायतीने घेतला आहे. गावातील निराधार नागरिकांची घरपट्टी पूर्णतः माफ करण्यासह स्मशानभूमी शुल्कही माफ करण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला. सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे गावातील गरजू, निराधार कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून ग्रामपंचायतीच्या या समाजाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी सरपंच अवी उर्फ दत्ताराम दुतोंडकर यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी मधुकर नवार, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य रविंद्र धोंड, ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य विनू मठकर, दिपाली नांदोस्कर, विद्या कांबळी, सविता परब, विद्या गोवेकर, राखी धोंड आदी उपस्थित होते.या समाजाभिमुख निर्णयामुळे वायंगणी ग्रामपंचायतीचे तसेच सरपंच अवी दुतोंडकर यांच्या निर्णयाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.