वेंगुर्लेत रविवारी ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट २०२६......रोटरी क्लब, नगरपरिषद आणि वर्ल्ड पॉवर इंडियाचा संयुक्त उपक्रम......योग, फिटनेस प्रशिक्षण व पोषण मार्गदर्शनासह विविध कार्यक्रम

वेंगुर्लेत रविवारी ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट २०२६......रोटरी क्लब, नगरपरिषद आणि वर्ल्ड पॉवर इंडियाचा संयुक्त उपक्रम......योग, फिटनेस प्रशिक्षण व पोषण मार्गदर्शनासह विविध कार्यक्रम

वेंगुर्ला

 

       नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला, वेंगुर्ला नगरपरिषद आणि वर्ल्ड पॉवर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट वेंगुर्ला २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ११.३० या वेळेत कालेलकर मिनी हॉल, वेंगुर्ला येथे हा उपक्रम पार पडणार आहे.कार्यक्रमात योग आणि ध्यान, फिटनेस प्रशिक्षण, पोषण मार्गदर्शन तसेच विशेष अतिथींचे सल्ला व प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांना आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजन गिरप साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संस्थापक संतोष नरहरी गावडे असून, ते ब्लॅक बेल्ट प्रॅक्टिस योगा, ५ क्लासेस सर्टिफाइड जिम ट्रेनर तसेच माजी पॅन इंडिया मॅनेजर टाळवॉकर्स म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोस्टरवर देण्यात आली आहे.सर्वांसाठी मोफत प्रवेशया आरोग्यविषयक उपक्रमासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. सहभागी होणाऱ्यांनी योगा मॅट सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उपस्थितांसाठी आरोग्यदायी जलपानाची व्यवस्था करण्यात आली आहे.वेंगुर्ला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.