बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मालवण दोघे ताब्यात....बांदा पोलिसांची कारवाई

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मालवण दोघे ताब्यात....बांदा पोलिसांची कारवाई

बांदा

 

       इन्सुली चेकनाक्यावर बांदा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी कार जप्त केली आहे. या कारवाईत मालवण येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.८३ हजार रुपयांच्या दारुसह एकूण ४ लाख २ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इन्सुली चेकनाका येथे बांदा पोलीस उपनिरीक्षक शिवराज झंजुरणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरुनाथ परब आणि नेल्सन फर्नांडिस हे नियमित वाहन तपासणी करत होते. यादरम्यान गोव्याकडून येणारी कार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ती थांबवून झडती घेतली. यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा साठा मिळून आला. याप्रकरणी संदीप शंकर जगताप (वय ४८) आणि उमेश परशुराम वडर(वय ३४, दोघेही रा. गुरमवाडी कट्टा, ता. मालवण) यांना ताब्यात घेण्यात आले. कार मधून ८३ लाख ४० रुपयांची दारू व सुमारे ३ लाख रुपये किमतीची कार व जुनी मोटरसायकल असा एकूण ४ लाख २ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.