मालपे येथे कृषीदुतांमार्फत राबविण्यात आली स्वच्छ्ता मोहीम.

मालपे येथे कृषीदुतांमार्फत राबविण्यात आली स्वच्छ्ता मोहीम.

देवगड.

  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न कृषी महाविद्यालय,सांगुळवाडी या कॉलेजचे अंतिम वर्षातील विद्यार्थी (कृषिदूत) ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून देवगड तालुक्यातील मालपे या गावामध्ये निवासी आहेत. या कृषी दुतांमार्फत मालपे गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.त्याचबरोबर त्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ गाव,सुंदर गाव बनविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.त्यांनी मालपे गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, गावातील रस्ते,गावातील चौकांची साफसफाई केली. त्याचबरोबर त्या गावात असणारे गावचे ग्रामदैवत श्री वाडेश्वर मंदिर व गावातील अंगवणदेवी परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचे महत्त्व ग्रामस्थांना सांगितले.
  हा कार्यक्रम कृषिदूत वृषभ चिकणे, विकास पवार, श्रीकांत जाधव, समर्थ जाधव, प्रणव खरतोडे, सार्थक जगताप, आदित्य कुडले यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ.होळकर, श्री. कदम, श्री. गायकवाड, मयेकर मॅडम यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले.