'भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता', मंत्री केसरकरांच्या विरोधात परुळेत बॅनर.

'भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता', मंत्री केसरकरांच्या विरोधात परुळेत बॅनर.

वेंगुर्ला.

 

    महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रीपदे भूषविलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर लावण्यात आला आहे. दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण परुळे भागात त्यांना विरोध करणारे बॅनर लागले. त्यावर 'भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता', अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात लावले आहेत.हे बॅनर सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

  

बॅनरमध्ये पुढील आशयाचा मजकूर -

 

   म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.

 

मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्च्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.

 

तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.

 

आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला.आमी मात्र सगळा आसान थयच रवलो.तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??

 

भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका.भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.

  अशा आशयाचे फलक रविवारी सकाळी म्हापण, परूळे, पंचक्रोशीत दिसले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी  निवती पोलिसांनी ते फलक ताब्यात घेतले आहेत.