भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना व सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे
कणकवली
पालकमंत्री नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना
पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले, "पुढील चार वर्षांत भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना, मानधन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. महायुती सरकारकडून जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत."
वारकरी भवन उभारणी
पालकमंत्री नीतेश राणे यांनी सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे वारकरी भवन उभारण्याची घोषणाही केली. त्यासाठी जागा घेण्यात आली असून, येत्या दोन ते तीन वर्षांत वारकरी भवन उभारण्यात येणार आहे.
भजन सदन उभारणी
कणकवलीत भजन सदन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी जागाही निश्चित करण्यात आली आहे. त्याचे बांधकाम काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
संतोष कानडे यांचे कार्य
भजनी कलाकारांच्या प्रश्नांसाठी संतोष कानडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांच्या कार्याचे कौतुक करताना पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले, "संतोष कानडे यांनी आपल्या पदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. वारकरी संप्रदाय आणि भजनी कलाकारांना सरकारशी जोडणारा एक भक्कम दुवा म्हणून ते कार्यरत आहेत."

konkansamwad 
