कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्षपदी अतुल बंगे

कुडाळ
कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल बंगे तर सचिवपदी शरद पावसकर यांची निवड करण्यात आली आहे. कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची जनरल सभा भंडारी समाजाचे जेष्ठ नेते वासुदेव पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कुडाळ तालुका भंडारी समाजाचा वाद गेली बरीच वर्षे धर्मादाय आयुक्त ओरोस न्यायालयात सुरू होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सदरची सभा लक्ष्मण केळुसकर यांनी निमंत्रित करावी अशी सूचना होती. त्यानुसार केळुसकर यांच्या निवासस्थानी जनरल सभा पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष अतुल बंगे, उपाध्यक्ष प्रमोद चिंदरकर, सचिव शरद पावसकर, सहसचिव विठ्ठल कांबळी, खजिनदार संदीप साळसकर, सदस्य संतोष चिपकर, गजानन वेंगुर्लेकर, मनोहर आरोलकर, प्रभाकर साळगावकर, विनोद मयेकर, गुरुनाथ सरमळकर, दीलीप तुळसकर, लक्ष्मण केळुसकर, सुभाष सारंग, चंद्रकांत सारंग तसेच सल्लागार–एकनाथ टेमकर, मोहन तांडेल अशा प्रकारची कार्यकारिणी निवडण्यात आली. भंडारी समाजाचे जेष्ठ नेते माजी अध्यक्ष मामा माड्ये यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी राजु गवंडे, राजन कोरगावकर, समील जळवी, लक्ष्मण मोरजकर, मंगेश बांदेकर, अनंत वाड्येकर, दर्शन कुडव, विलास पावसकर आदी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला भंडारी समाजातील देवाज्ञा झालेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.