लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंथन स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ विजयी.

लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंथन स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ विजयी.

वेंगुर्ला.

    सेवानंद फाऊंडेशन शिरोडा आणि राजू गवंडे मित्र मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित T10 प्रकारच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत मंथन स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाने देवगड संघाचा एकतर्फी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना देवगड संघाने सुमित वर्देकरच्या 24, राजारामच्या 11 आणि प्रथमेश गावडेच्या झटपट 17 धावांच्या जोरावर निर्धारित 10 षटकात 77 धावांचे लक्ष्य ठेवले.गोलंदाजी करताना बाबू तारीने 2 तसेच शुभम,प्रतीक आणि दर्शन ने प्रत्येकी 1 बळी मिळवला.ह्या आव्हानाचा पाठलाग करताना मंथन स्पोर्टसच्य सलामीवीरांनी आतिषय सुरेख सुरूवात केली सलामीला आलेल्या विपुल पवार ने अतिशय सुरेख फटकेबाजी करत वैयक्तिक 24 धावांची बहारदार खेळी केली.त्याच्याच जोडीला आलेल्या आणि ह्या क्रिकेटच्या मोसमात अतिशय बहरात असलेल्या डावखुऱ्या हाताच्या तन्मय पडवळ ने आकर्षक 27 धावा जमवत सामना संघाच्या बाजूने वळविला ह्या सुरेख सलामी नंतर बाद झालेल्या विपुल ची जागा घेण्यासाठी आलेल्या सुप्रसिद्ध खेळाडू दर्शन बांदेकर ने आधिक पडझड न होऊ देत आपल्या संघाला 9 गडी राखत विजयश्री मिळवून देत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले त्याने नाबाद 17 धावा जमविल्या.
  तत्पूर्वी सकाळच्या सत्रात पहिला उपांत्य सामना सेवानंद शिरोडा आणि मंथन स्पोर्ट्स वेंगुर्ला ह्यांच्यात पार पडला.नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल जिंकल्यानंतर मंथन स्पोर्ट्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.प्रथम फलंदाजी करताना शिरोडा संघाने यश गडेकरच्या 15,सुंदर पालव 11 आणि सिद्धांत गवंडे 12 ह्यांचा जोरावर निर्धारित 10 षटकात 70 धावा जमवील्या गोलंदाजी करताना बाबू आणि शुभम ने प्रत्येकी 2 संकेत 3 आणि दर्शन ने 1 बळी मिळविला.
70 धावांचा पाठलाग करताना प्रारंभीचे फलंदाज विपुल पवार आणि तन्मय पडवळ ह्यांनी आतिशय सावध सुरुवात केली.विपुल ने 20 आणि तन्मय ने देखील 20 धावा केल्या.प्रारंभीचे दोनी फलंदाज बाद झाल्यानंतर दर्शन बांदेकर झालेला धावचीत मंथन स्पोर्ट्स संघाला अडचणीत आणणारा होता मात्र ऐन मोक्याच्या क्षणी अष्टपैलू खेळाडू समीर वेंगुर्लेकर ने केलेली 22 धावांची खेळी अतिशय चुरशीच्या अटीतटीच्या सामन्यात मंथन स्पोर्ट्स संघाला विजय मिळवून गेली आणि दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला.गोलंदाजी करताना निखिल आणि आशिष शिरोडकर ह्यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.सम्योचीत खेळी करणारा समीर वेंगुर्लेकर सामन्याचा सामनावीर ठरला. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना वेंगुर्ला स्पोर्ट्स आणि देवगड ह्या दोन संघदर्म्यान रंगला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत उदय  दाभोलकरच्य 10, प्रथमेश नाईक 11 आणि सोहेल शेख 13 ह्या जोरावर निर्धारित 10 षटकात 67 धावा जमविल्या. प्रत्युत्तर देताना फलंदाजीला उतरलेल्या गुरू आणी सुमित ने सुरेख फलंदाजी करतय ह्या धावांचा पाठलाग अतिशय सहज पूर्ण केला.वैयक्तिक 23 धावा जमविणारा सुमित ह्या सामन्याचा सामनावीर ठरला.
    स्पर्धेच्या वैयक्तिक बक्षिंसाचा विचार करता तन्मय पडवळ ह्याला उत्कृष्ट फलंदाज तसेच अंतिम सामना सामनावीर,शुभम आरोलकरला उत्कृष्ट गोलंदाज आणि अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या डावखुऱ्या हाताच्या समीर वेंगुर्लेकर ह्याला सर्धेचा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.विजेत्या संघाला रोख रू.10000 व अकर्षक चषक उपविजेत्या संघाला रोख रू.5000 आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.ह्या संपूर्ण स्पर्धेचे आकर्षक चषक रेडी येथील युवा उद्योजक आणि सीबर्ड संघमालक आशिष शिरोडकर ह्यांनी पुरस्कृत केले होते.
  बक्षीस वितरण वेळी व्यासपीठावर क्रीडा प्रशिक्षक बाळू खामकर, बाबली वांयगणकर, जयवंत चुडनाईक,विवेक सोकटे,ऍड.प्रथमेश नाईक तसेच मंथन स्पोर्ट्स संघमालक श्री.मुकुल सातारडेकर,पंच,संघनायक आणि सेवानंद फाऊंडेशन चे सर्वेसर्वा श्री.ऋतुराज पेटकर उपस्थित होते.
ह्या स्पर्धेला लाभलेले सावंतवाडीतील प्रसिद्ध मराठी समालोचक श्री.गुरू चिटणीस ह्यांनी आभार प्रदर्शन तसेच सूत्रसंचालन केले.स्पर्धेला निवृत्ती नाईक, बाबू टेमकर आणि राजू गवंडी ह्यांनी पंचाची महत्त्वाची भूमिका पार पाडली ह्या सर्वांना सेवानंद तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर सतीश डोंगरे, पिटर फर्नांडिस, सिद्धांत गवंडे,लिंगराज चौघुले, पराग पडवळ ह्यांनी गुणलेखन केलं.
   बक्षीस समारंभा दरम्यान ह्या स्पर्धेला खेळाडू म्हणून लाभलेला आणि सध्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रथमेश गावडे,नावाजलेला खेळाडू आणि आयपीएल मध्ये मुंबई इंडियनस चे प्रतिनिधित्व करणाऱ्या दर्शन बांदेकर चे देखील स्वागत आणि सन्मान करण्यात आला.तसेच स्पर्धे दरम्यान देवगड संघाकडून खेळलेल्या आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चुणूक दाखवणाऱ्या एका अवघ्या 11 वर्षाच्या संकेत जाधव ह्या खेळाडूला सुद्धा सेवानंदमार्फत प्रोत्साहनपर गौरविण्यात आले आणि त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
    सेवानंद फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था गेली आठ वर्षे क्रीडा,सामाजिक,सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे कामगिरी करत आहे.सिंधुदुर्ग लेदर क्रिकेट ला चालना देण्यासाठी ह्या संस्थेचे सर्वेसर्वा श्री.ऋतुराज पेटकर ह्याचा संकल्पनेतून ही स्पर्धा वेंगुर्लेच्य कॅम्प मैदानावर पाच दिवस पार पडली ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेसाठी वेंगुर्ला कॅम्प मैदान उपलब्ध केल्याबद्दल वेंगुर्ला तालुका लेदर बॉल क्रिकेट असोसिएशन चे विशेष आभार मानण्यात आले.स्पर्धा यशस्वितेसाठी क्रिकेट प्रशिक्षक श्री.सतीश डोंगरे,श्री.आशिष शिरोडकर,किरण परब, राजू गवंडे तसेच सेवानंद शिरोडाचे ऋतुराज पेटकर,सागर नाणोसकर,आशिष शिरोडकर,कमलेश अमरे आणि पराग पडवळ त्या बरोबरच पिटर फर्नांडिस, लिंगराज चौघुले, सिद्धांत गवंडे आणि कु.नील किरण परब तसेच अंश प्रकाश गावडे ह्या सर्वांचा मोलाचा सहभाग राहिला.
   सरतेशेवटी भविष्यात अशा प्रकारचे स्पर्धा उपक्रम वारंवार आपण घेऊ अशी ग्वाही सेवानंद शिरोडा चे सर्वेसर्वा ऋतुराज पेटकर ह्यांनी खेळाडूंना आणि उपस्थित मान्यवरांना दिली.