आनंदयात्री वाङ्मय मंडळ आयोजित कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर.

आनंदयात्री वाङ्मय मंडळ आयोजित कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर.


वेंगुर्ला 
    आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांच्यावतीने बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनात घेण्यात केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वक्तृत्व स्पर्धा (इ.५वी ते ७वी) आणि (इ.८वी ते १०वी) आणि कथाकथन स्पर्धा ( इ.८वी ते १०वी) अशा गटात संपन्न झाल्या. कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा या दोन्ही मोठ्या गटात कुडाळ हायस्कूलच्या श्रावणी राजन आरावंदेकर हिने बाजी मारली तर लहान गटात वक्तृत्व स्पर्धेत अनुश्री कांबळी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
      सदर स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध मालवणी कवी रुजारिया पिंटो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आनंदयात्रीचे अध्यक्ष वृंदा कांबळी, डॉ.संजय लिंगवत, प्रदीप कुबल, चारुता दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धा 'माझा आवडता लेखक किंवा कवी' या विषयावरती दोन गटात संपन्न झाली. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा.वैभव खानोलकर प्रा. महेश  बोवलेकर, प्रा .वामन गावडे, प्रा.जी.पी. धुरी यांनी तर कथाकथन स्पर्धेचे परीक्षण विद्या कौलापूरे व प्रा. पांडुरंग कौलपूरे यांनी केले.

           स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 
वक्तृत्व स्पर्धा( मोठा गट )
प्रथम : श्रावणी राजन आरावदेकर (कुडाळ हाय. कुडाळ)
द्वितीय: साक्षी मोहन दळवी (नेमळे हाय. नेमळे)
तृतीय क्रमांक: स्नेहल संतोष भुबे (सरस्वती विद्यालय, टाक)
उत्तेजनार्थ प्रथम: रश्मी मधुकर भगत (रां.धो.खानोलकर हाय. मठ)
उत्तेजनार्थ द्वितीय: स्नेहल संदीप मराठे (श्री शिवाजी हाय. तुळस)

वक्तृत्व स्पर्धा लहान गट
प्रथम: श्राव्या अनुप कांबळी ( जि.प. उभादांडा न.१)
द्वितीय: प्रांजल रुपेश नार्वेकर (जि.प. उभादांडा न.३)
तृतीय : माधव श्रीपाद ओगले (जि.प. वेंगुर्ला न.२)
उत्तेजनार्थ प्रथम: स्वरा शंकर घारे (श्री शिवाजी हाय.तुळस)
उत्तेजनार्थ द्वितीय: श्रीनिवास बाबुराव मयेकर (जि.प.वेंगुर्ला न.३)

कथाकथन स्पर्धा इयत्ता (८वी ते १०वी)
प्रथम: श्रावणी राजन आरावदेकर (कुडाळ हाय.कुडाळ)
द्वितीय: महीमा रुपेश नार्वेकर (न्यू इंग्लिश स्कूल,उभादांडा)
तृतीय: स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर (न्यू इंग्लिश स्कूल,उभादांडा)
उत्तेजनार्थ प्रथम: दीपा प्रशांत आरोसकर (श्री शिवाजी हाय. तुळस) 
उत्तेजनार्थ द्वितीय: वेदिका शिवराम कुडव ( सरस्वती विद्यालय, टाक)
       
          सदर स्पर्धेचे सूत्रांचालन प्रा. डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार महेंद्र मातोंडकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विवेक तिरोडकर, महेश राऊळ, गुरुदास तिरोडकर, मंगेश सावंत, संजय पाटील यांनी मेहनत घेतली.