कुसबे बोरीचा माळ येथील राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन. शिवसेना आंब्रड विभागाच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धचे आयोजन.

कुसबे बोरीचा माळ येथील राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.  शिवसेना आंब्रड विभागाच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धचे आयोजन.

कुडाळ.

   तालुक्यातील कुसबे बोरीचा माळ येथे  शनिवार 9 मार्च रोजी शिवसेना आब्रंड विभागाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या  राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राज्य भरातुन एकुण 50 बैलगाडी स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.  बैलगाडी स्पर्धा पाहण्यासाठी जिल्हा भरातुन हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
   यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख ‌अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धूरी, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख महेश सावंत, विभाग प्रमुख विकास राऊळ,राजू गवंडे, सचिन काळप, दीपक आंगणे, नितीन सावंत, कुसबे सरपंच समीक्षा जाधव, सामाजिक कार्यकर्ते आबा मुंज, माजी जि.प.सदस्या सौ.कल्पिता मुंज, कुसबे शाखाप्रमुख राजेंद्र घाडीगांवकर, कुसबे युवासेना शाखाप्रमुख नितीन महाडेश्वर, वर्दे सरपंच महादेव पालव, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, स्वप्नील शिंदे, नागेश ओरसकर, आंब्रड ग्रामपंचायत सदस्य गौरी दळवी, सेजल परब, कुसबे ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत, विजय महाडेश्वर, सविता सावंत आदी उपस्थित होते.