भाजपा पडेल मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर यांची फेरनिवड

भाजपा पडेल मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर यांची फेरनिवड

 

विजयदुर्ग

 

        भाजपा पडेल मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर यांची फेरनिवड करण्यात आली. पक्ष निरीक्षक मनोज रावराणे यांनी बंड्या नारकर यांची निवड जाहीर केली. नूतन तालुकाध्यक्ष निवडीवेळी महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या नावावर पक्ष निरीक्षक मनोज रावराणे यांच्या उपस्थितीत सर्वांनी शिक्कामोर्तब केले. यावेळी बाळ खडपे, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस, अमोल तेली, आरिफ बगदादी, संजय बोंबडी, रवि तिर्लोटकर, रामकृष्ण जुवाटकर, अंकुश ठुकरुल, भूषण पोकळे, अजित राणे, संजय लाड, मकरंद जोशी, संदीप तावडे, सुनील जाधव, संदीप पुजारे, विश्वनाथ पडेलकर, प्रभा वादेकर, महेश पडवळ, रत्नाकर सर्वनकर उपस्थित होते.