स्वच्छता भारत मिशन अंतर्गत बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसराची साफसफाई.

सावंतवाडी.
स्वच्छता भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात श्री समर्थ बैठक डाॅ. नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग प्रार्थमिक आरोग्य केंद्र बांदा येथे स्वच्छता मिशन कार्यक्रमात बांदा बैठकितील सदस्यांनी हॉस्पिटल मधील आवाराची स्वच्छता करुन स॔पुर्ण परिसर अवघ्या दिड तासात स्वच्छ केला. या वेळी दिडशेहुन अधिक सद्स्य उपस्थित होते. माजी उपसरपंच हर्षद कामत,ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर शिवसेना उपविभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई,काजू बागायतदार व उद्योजक नितिन महावळणकर, पत्रकार अजित दळवी,आशितोष भांगले व त्याचे सर्व सहकारी स्वच्छता ही सेवा या मोहीम मध्ये बहुसंख्येने उपस्थित राहुन या श्रीसेवेचा लाभ घेतला.या सदस्यांनी सुमारे पाच ते सहा टन कचरा जमा करुन त्याची योग्य पध्द्तीने विल्हेवाट लावली. या सर्व श्रीसदस्यांचे बांदा वासियांनी कौतुक केले.