शिंदे शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर. राजापुरात किरण सामंत यांना उमेदवारी जाहिर सावंतवाडीत दीपक केसरकर तर रत्नागिरीत उदय सामंत
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली याची जाहीर केली. यानंतर आता शिंदेच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिंदेच्या शिवसेना पक्षाच्या पहिल्या यादीत पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
दरम्यान, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरलेयत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. माहिममधून त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालीय. अमित ठाकरे विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत. उदय सामंत यांच्या बंधू किरण सामंत यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे.
१ कोपरी पाचपाखाडी - एकनाथ संभाजी शिंदे
२ साक्री (अज) श्रीमती मंजूळाताई तुळशीराम गावित
३ चोपडा (अज) चंद्रकांत बळवंत सोनावणे
४ जळगाव ग्रामिण - गुलाबराव रघुनाथ पाटील
५ एरंडोल - अमोल चिमणराव पाटील
६ पाचोरा - किशोर (अप्पा) धनसिंग पाटील
७ मुक्ताईनगर - चंद्रकांत निंबा पाटील
८ बुलढाणा - संजय रामभाऊ गायकवाड
९ मेहकर (अजा) डॉ संजय भास्कर रायमुलकर
१० दर्यापुर (अजा) शिवसेना - अभिजीत आनंदराव अडसूळ
११ रामटेक - आशिष नंदकिशोर जैस्वाल
१२ भंडारा (अजा) नरेंद्र भोजराज भोंडेकर
१३ दिग्रस - संजय दुलीचंद राठोड
१४ नांदेड उत्तर - बालाजी देविदासराव कल्याणकर
१५ कळमनुरी -संतोष लक्ष्मणराव बांगर
१६ जालना - अर्जुन पंडितराव खोतकर
१७ सिल्लोड - अब्दुल सत्तार अब्दुल नबी
१८ छ. संभाजीनगर मध्य - प्रदिप शिवनारायण जैस्वाल
१९ छ. संभाजीनगर पश्चिम (अजा) संजय पांडूरंग शिरसाट
२० पैठण - विलास संदिपान भूमरे
२१ वैजापुर - रमेश नानासाहेब बोरनारे
२२ नांदगाव - सुहास द्वारकानाथ कांदे
२३ मालेगाव बाह्य- दादाजी दगडूजी भुसे
२४ ओवळा माजीवडा - प्रताप बाबूराव सरनाईक
२५ मागाठाणे प्रकाश राजाराम सुर्वे
२६ जोगेश्वरी (पूर्व) श्रीमती मनिषा रविंद्र वायकर
२७ चांदिवली - दिलीप भाउसाहेब लांडे
२८ कुर्ला (अजा)मंगेश अनंत कुडाळकर
२९ माहिम - सदा (सदानंद) शंकर सरवणकर
३० भायखळा - श्रीमती यामिनी यशंवत जाधव
३१ कर्जत शिवसेना- महेंद्र सदाशिव थोरवे
३२ अलिबाग - महेंद्र हरी दळवी
३३ महाड - भरतशेठ मारूती गोगावले
३४ उमरगा (अजा) ज्ञानराज धोंडीराम चौगुले
३५ परांडा - डॉ. तानाजी जयवंत सावंत
३६ सांगोला - शहाजी बापू राजाराम पाटील
३७ कोरेगाव -महेश संभाजीराजे शिंदे
३८ पाटण - शंभूराज शिवाजीराव देसाई
३९ दापोली- योगेश रामदास कदम
४० रत्नागिरी - उदय रविंद्र सामंत
४१ राजापुर - किरण रविंद्र सामंत
४२ सावंतवाडी - दीपक वसंतराव केसरकर
४३ राधानगरी - प्रकाश आनंदराव आबिटकर
४४ - करविर - चंद्रदिप शशिकांत नरके
४५ खानापुर - शिवसेना सुहास अनिल बाबर