कणकवली-जानवली पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न

कणकवली
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्यावतीने जानवली पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये जानवली गावचे सरपंच अजित पवार, ग्रामपंचायत अधिकारी अर्चना लाड, सदस्य नितीन राणे, दिशा राणे, दामोदर सावंत, जि.प. माजी उपाध्यक्ष रंजन राणे, माजी उपसरपंच स्वाती राणे, तसेच जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे, कर्मचारी विशाखा कासले, दळवी, सिद्धेश माळकर, हर्षद खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्यावतीने हेलन किलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जानवली गावचे सरपंच पवार व जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. कर्मचारी दळवी यांनी अहवाल वाचन केले. या मेळाव्यामध्ये दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली. काही दिव्यांग बांधवांचे रेल्वेपास करण्यासाठी कागदपत्रे घेतली. एका दिव्यांग बांधवाला काठी देण्यात आली. सदर मेळाव्यास ५० हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. जानवली ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांगासाठी उपहाराची व्यवस्था केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना लाड यांनी केले असून कर्मचारी विशाखा यांनी उपस्थितांचे आभार मानले.