ऑटो रिक्षा संघटनेकडून लक्ष्मीपूजनाचा भन्नाट डबलबारी भजन कार्यक्रम
शिरोडा
दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, गांधीचौक, शिरोडा यांच्या वतीने एक अप्रतिम २०×२० डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक: मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५
वेळ: रात्री ठीक ९.०० वाजता
स्थळ: ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, गांधीचौक, शिरोडा
भजनी सामना रसिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे
श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ, लोरे (ता. कणकवली)
बुवा – कु. अंकिता गावडे
गुरुवर्य – लक्ष्मी-विजय (गुरु) सावंत
पखवाज – विपुल सावंत
तबला – हर्ष गावडे
श्री अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ, साळेल(ता. मालवण)
बुवा – कु. रिया राजेश मेस्त्री
गुरुवर्य – श्री. राजेश मनोहर मेस्त्री
पखवाज – मिलींद लाड
तबला – भावेश लाड
दिवाळीच्या मंगल वातावरणात भक्ती, सुर आणि तालांचा अविष्कार गांधीचौक शिरोडा येथे होणार उत्साहाचा सोहळा संपन्न

konkansamwad 
