वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनकडून कोलकत्ता येथील घटनेचा निषेध.

वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनकडून कोलकत्ता येथील घटनेचा निषेध.

वेंगुर्ला.

  कोलकत्ता मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व क्रूर हत्येचा जाहिर निषेध शहरात मूक निषेध मोर्चा काढून करण्यात आला.
 या घटनेचा वेंगुर्ला येथील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी निषेध केला.यावेळी वेंगुर्ला दाभोली नाका ते हॉस्पिटल नाका असा मेणबत्त्या पेटवून मूक निषेध मोर्चा काढण्यात आला.
   या मोर्चात वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर्स तसेच परिचारिका, इनरव्हील व लिनेस क्लबचे पदाधिकारी, वेंगा फिटनेस ग्रुपचे पदाधिकारी, जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, वकिल, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते.