राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

  अनुसूचित जातीच्या मुला- मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज www.maharashtra.gov.in (जलद दुवे ताज्या घडामोडी) येथे नमुद संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय ३ चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, योजनेची सविस्तर  माहितीसाठी  संकेतस्थळाला भेट द्यावी.
   या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.०२३६२-२२८८८२ येथे संपर्क साधावा.