सावंतवाडी येथील श्री देव रवळनाथाचा उद्या पहिला जात्रोत्सव

सावंतवाडी येथील श्री देव रवळनाथाचा उद्या पहिला जात्रोत्सव

 

सावंतवाडी

 

       सावंतवाडी येथील श्री देव रवळनाथाचा पहिला जात्रोत्सव उद्या, ५ नोव्हेंबरला विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी श्रींची विधिवत पूजा अभिषेक व नंतर गाऱ्हाणे नवस बोलणे, फेडणे, रात्री ११ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार असून पालखी सोहळा संपल्यानंतर ओटवणे दशावतार मंडळीचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.