भाजपा महीला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ शक्तीवंदन अभियानांतर्गत सिंधुदुर्गातील सीआरपी व एनजीओ व बचत गटातील महीलांशी संवाद करणार. कुडाळ येथे १ मार्च रोजी शक्तीवंदन कार्यक्रम.

भाजपा महीला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ शक्तीवंदन अभियानांतर्गत सिंधुदुर्गातील सीआरपी व एनजीओ व बचत गटातील महीलांशी संवाद करणार.  कुडाळ येथे १ मार्च रोजी शक्तीवंदन कार्यक्रम.

कुडाळ.

   भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री व शक्तीवंदन अभियान प्रमुख मा.तरुण चुग, राष्ट्रीय सचिव व शक्तीवंदन अभियान सह प्रमुख विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनात " शक्तीवंदन अभियान " संपुर्ण देशभर राबविले जात आहे. हे अभियान जिल्हा, तालुका व गावपातळीवर न्यायचे आहे. या अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची अभियान प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असून, महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या सहीत १५ जणांची " शक्तीवंदन कमिटी " तयार केली असून, प्रत्येक मंडल निहाय २५ जणांची " शक्तीसंगीनी " कमीटी तयार केली आहे. या अभियानात CRP, NGO व बचत गटातील महीलांचे मेळावे घेण्यात येणार आहेत.
    महीला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या १ मार्च च्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या अनुशंगाने भाजपा कुडाळ तालुका कार्यालयात नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, अभियान संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, प्रदेश सदस्य संध्याताई तेरसे, महीला प्रदेश सदस्या दिप्ती पडते, जि.का.का.सदस्य आदिती सावंत, जिल्हा उपाध्यक्षा मिसबा शेख, कुडाळ मंडल अध्यक्षा आरती पाटील, मंडल सरचिटणीस रेवती राणे, कुडाळ शहर अध्यक्षा मुक्ती परब, शहर उपाध्यक्षा तेजस्वीनी वैद्य, शहर सरचिटणीस अक्षता कुडाळकर व रीना पडते, शहर उपाध्यक्षा विशाखा कुलकर्णी तसेच भाजपा ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल उपस्थित होते.
   यावेळी शक्तीवंदन कार्यक्रमाचे नियोजन करून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या १५ महिलांचा सन्मान प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमास जिल्ह्यातुन जास्तीत जास्त महीलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी केले आहे.