वेंगुर्ला भाजपाच्या वतीने योग दिनानिमित्त आयोजित योगाभ्यास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘२१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिन’ देशभरातील जनतेस विविध शिबीरात सहभागी होऊन साजरा करण्याचे आवाहन केले.या आवाहनाला साद देत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने कॅम्प मैदानावरील तालुका क्रीडा केंद्राच्या बॅडमिंटन हाॅल मध्ये योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
योग शिक्षिका साक्षी बोवलेकर हीने योगाभ्यास घेतला. यावेळी रोटरी क्लब,माझा वेंगुर्ला, खर्डेकर महाविद्यालयातील शिक्षक व एन.सी.सी.कॅडेट, डाॅक्टर, वकिल, खेळाडु तसेच नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी योग कार्यक्रम संयोजक माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांनी सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.तसेच सहसंयोजक अँड. सुषमा खानोलकर यांच्या हस्ते योगशिक्षिका सौ.साक्षी बोवलेकर हीचा शाल घालून सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महीला ता.अध्यक्षा सुजाता पडवळ, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, श्रेया मयेकर, उर्वी गावडे, सुरेंद्र चव्हाण, बुथप्रमुख रविंद्र शिरसाठ इत्यादी भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.