एसटी बस रस्ता सोडून बाजूला घसरली......सुदैवाने मोठा अनर्थ टाळला

वेंगुर्ला
समोरून आलेल्या गाडीला साईड देताना कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील मठ येथील वळणावर एसटी बस रस्ता सोडून बाजूला घसरली. सुदैवाने बस चालकाने वेळीच बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील सर्वजण सुखरूप आहेत. कुडाळ येथून वेंगुर्लेच्या दिशेने ही एसटी बस येत होती. गाडीमध्ये एकूण ३१ प्रवासी होते. सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या रस्त्यावरील वळणांवर असलेल्या झाडांच्या फांद्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तरी त्या वेळीच तोडाव्यात अशी मागणी लोकांकडून होत आहे.