सामाजिक कार्यकर्ते सचिन देसाई यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेनकोट वाटप.

सामाजिक कार्यकर्ते सचिन देसाई यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेनकोट वाटप.

परुळे

 परुळे गावचे दानशूर वक्तीमत्व असलेले सचिन देसाई  यांच्या माध्यमातून शेतीची कामे करताना पाऊसा पासून सुरक्षा व्हावी या उदात्त हेतूने सर्व शेतकऱ्यांना रेनकोट(खोळ) वाटप सचिन देसाई संपर्क कार्यालय परुळे येथे करण्यात आला.
 यावेळी अविनाश देसाई, भोगवे उपसरपंच रूपेश मुड्ये, विष्णू माधव, ग्रा.प.सदस्य अभय परुळेकर, शरद हडकर, निलेश तेली, चंदन माड्ये, आदींसह शेतकरी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
   शेतकरी  बांधवांनी उपस्थित राहून सदरील रेनकोट(खोळ) यांचा लाभ घेतला.यापूर्वी सचिन देसाई यांनी विद्यामंदिर परुळे येथे दहावी उत्तीर्ण झालेल्या 42  विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आले आहे. या रेनकोट वाटप कार्यक्रमा वेळी ग्रामस्थांनी सचिन देसाई यांचे धन्यवाद व्यक्त केले. यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील असे मत व्यक्त केले.