वेगवेगळ्या गुन्ह्यात दोषी असणाऱ्या एकाची जामिनावर मुक्तता......दोषीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम

वेगवेगळ्या गुन्ह्यात दोषी असणाऱ्या एकाची जामिनावर मुक्तता......दोषीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम

 

कुडाळ
 

      कुडाळ येथील सेंट्रिंग च्या प्लेट चोरी प्रकरणी दोषी विजय इंगळे याला 15/04/2025 रोजी अटक करून 16/04/2025 रोजी मे. न्यायालयात हजर केले असता त्याची श्री. ढोरे यांनी जामिनावर मुक्तता केली, त्याच दिवशी कुडाळ येथील दुसऱ्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेऊन दि. 17/04/2025 रोजी कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला त्या गुन्ह्यातही जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्याच दिवशी सावंतवाडी येथील गुन्ह्यामध्ये म्हणजेच घंटा चोरी प्रकरणी त्याला ताब्यात घेऊन 18/04/2025 रोजी मे. न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली त्यानंतर त्याला 19/04/2025  रोजी मे. न्यायालयात हजर केले असता त्याची सावंतवाडी येथील न्यायाधीश श्रीम. मेस्त्री यांनी जामिनावर मुक्तता केली त्याच दिवशी त्याला वेंगुर्ला येथील गुन्ह्यामध्ये  म्हणजेच सेंट्रींगचे सामान चोरी प्रकरणी ताब्यात घेऊन 20/04/2025 रोजी मे. न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली त्यानंतर  21/04/2025 रोजी मे. न्यायालयात हजर केले असता त्याची वेंगुर्ला येथील न्यायाधीश श्री. रायरीकर यांनी जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर दोषीला दोडामार्ग मधली गुन्ह्यात त्याच दिवशी म्हणजे 21/04/2025 रोजी सेंट्रिग चे समान चोरी प्रकरणी  अटक करण्यात आली व दि. 22/04/2025 रोजी मे न्यायालयात हजर केले असता श्री. बावकर यांनी जामिनावर मुक्तता केली याकामी दोषीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर ॲड. प्रणाली मोरे, ॲड. वृषांग जाधव व ॲड. गौरव केसरकर यांनी काम पाहिले.