इन्सुली चेकपोस्टवर दारूसह ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली चेकपोस्टवर दारूसह ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

 

सावंतवाडी
 

  गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी इन्सुली चेकपोस्टवर मोठी कारवाई केली. या कारवाईत १ लाख ८० हजार रुपयांच्या दारूसह एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी मुन्ना जानी शेख (वय ५०, रा. आंध्र प्रदेश) व शरणकुमार व्यंकटराव कोम्मालपाटी (वय २५ रा. तेलंगणा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दारू वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप गाडी (एपी ३९ व्हीबी ०७३६) ताब्यात घेण्यात आली आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व उपनिरीक्षक युवराज झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रथमेश पवार, प्रसाद पाटील, कपिल हळदे व राकेश चव्हाण यांच्या पथकाने केली.