वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची निवड

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील भाजपा मंडल अध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी नकाशे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी अरविंद रावराणे, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, महिला अध्यक्षा प्राची तावडे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, माजी नगराध्यक्षा नेहा माईनकर, माजी उपनराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक रणजित तावडे, सुभाष रावराणे, बंड्या मांजरेकर, रवींद्र रावराणे, अतुल सरवटे, शांतिनाथ गुरव, दत्ताराम मोरे, अवधूत नारकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.