युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर १५ ऑगस्टला बसणार उपोषणाला. किंजवडे खालचीवाडी बाईतवाडी कदमवाडी जोडणाऱ्या साकवाचा प्रस्ताव तीन वर्षे धुळखात.
देवगड.
तालुक्यातील किंजवडे अन्नपूर्णा नदीवरील किंजवडे खालचीवाडी ते बाईतवाडी कदमवाडीला जोडणारा लोखंडी साकव गेली दहा वर्षे नादुरुस्तीत आहे. वर्षानुवर्षे मागणी करू नये याकडे दुर्लक्ष केले जाते यासाठी 15 ऑगस्ट रोजी 15 पंचायत समिती कार्यालय देवगड येथे उपोषणाला बसण्याचा इशारा योग काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंभुळकर यांनी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, किंजवडे खालचीवाडी ते बाईतवाडी- कदमवाडी जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव गेली १० वर्षे नादुरूस्त आहे. सदर साकव सध्यस्थितीत धोकादायक असून नागरिकांच्या जिविताशी शासनाचा हा खेळ चालु आहे. गेली ५/६ वर्षे गावातील शेतकरी पावसाळ्यात आपल्या शेतात जाण्यासाठी व पलिकडील बाईतवाडी - कदमवाडीच्या संपर्कात रहाण्यासाठी सदर साकवाचा उपयोग होतो. म्हणून श्रमदानातून सदरचे ग्रामस्थ पारंपारिक बांबू, फोपळीच्या सहाय्याने तात्पुरती डागडुज्जी करून वर्षानुवर्षे ये जा करतात.सदर साकवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटा पूल (साकव) मंजूर करण्यासाठी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करूनही काही राजकीय दृष्ट्या स्वार्थी प्रवृतीमुळे सदरचा परिपूर्ण प्रस्ताव कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग- सिंधुदुर्ग यांचेकडे गेली ३ वर्षे धुळखात पडला आहे! ही गोष्टच मुळात संतापजनक असून नागरिकांच्या जिवीताशी खेळ चालू आहे. या संपुर्ण प्रकरणाचा निषेध म्हणून किंजवडे गावातील ग्रामस्थ देवगड पंचायत समिती कार्यालयासमोर गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहोत.असा इशारा राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी निवेदनाद्वारे देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांना दिला आहे.यावेळी अजय राऊळ, शरद सुर्वे, अशोक घाडी, मंगेश सुर्वे, सुभाष सुर्वे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.