वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन.

वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन.

वेंगुर्ला.
     
   जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ADIP योजने अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे -कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट काठी, स्मार्ट फोन, एम.एस.आय.डी किट, श्रावणयंत्र यांचे मोजमाप व नाव नोंदणी शिबीर मंगळवार दि. ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.तरी वेंगुर्लेतील सर्व दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सोबत आणावायाची आवश्यक कागदपत्रे- 
दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड , यूडीआयडी कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ रेशन कार्ड ,दिव्यांगत्व दिसेल असे 2 फोटो.