वेळागर समुद्रात ८ जण बुडाले......मणियार आणि कित्तूर कुटुंबांवर काळाचा घाला

वेळागर समुद्रात ८ जण बुडाले......मणियार आणि कित्तूर कुटुंबांवर काळाचा घाला

 

 

शिरोडा
 

     कुडाळ येथून पर्यटनासाठी वेळागर येथे आलेले कुटुंबातील सदस्य समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाले. याबद्दल अधिक माहिती अशी की
    लोंढा, बेळगाव येथील कित्तूर कुटुंब व गुडीपुर, कुडाळ येथील मणियार कुटुंब, असे दोन कुटुंब पर्यटनासाठी वेळाघर या ठिकाणी आले होते. परिवारातील ८ जण हे पाण्यात हाताची साखळी करून खेळत असताना अंदाजे ०५.४५ वाजता अचानक मोठी लाट येऊन त्यापैकी ७ जणांना पाण्यात खेचून घेऊन गेली. यामधील तीन जणांचे मयत झाले असून त्यांचे मृत शरीर सापडले आहेत तसेच चार जण अद्याप बेपत्ता आहेत. एक मुलगी जिच नाव इसरा इम्रान कित्तूर(17)वाचली असून तिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे अधिक उपचार सुरू आहेत. फरीन इरफान कित्तूर (34), इबाद इरफान कित्तूर (13) व नमीरा आफताब अखतार (16) हे मयत झाले असून इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (36), इकवान इमरान कित्तूर (15), फराहान महम्मद मणियार (25), जाकीर निसार मणियार (13) हे अजून समुद्रात नापत्ता आहेत. समुद्रात बेपत्ता ४ जणांचा शोध अंधार पडेपर्यंत स्थानिक बोटिंच्या सहाय्याने घेण्यात आला असता ते अद्याप सापडले नाहीत. समुद्र खवळलेला असल्यामुळे व अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली असून उद्या पुन्हा शोधू मोहीम चालू करण्यात येणार आहे. मयत व्यक्तींबाबत अकस्मात मृत्यू  तसेच ४ बेपत्ता व्यक्तीबाबत बेपत्ता दाखल करून पुढील कारवाई वेंगुर्ला पोलीस ठाणे करीत आहे.