जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार – संजू परब.......मळेवाड येथे ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मळेवाड
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन प्रवेश होणार असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला.
दरम्यान, मळेवाड, कोंडूरा आणि साटेली येथील ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच मळेवाड सोसायटीचे चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. परब यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये मळेवाड सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर, व्हा. चेअरमन प्रकाश राऊत, संचालक गोविंद मुळीक, गोपिका रेडकर, अर्जुन तेली, धाकू शेळके, देऊ शिरसाट, रविंद्र तळवणेकर, दाजी पार्सेकर, दाजी गावडे, एकनाथ गावडे, दत्ताराम मुळीक, तसेच युवा सेना उपजिल्हा प्रमुख सतिश नाईक, विभागप्रमुख दाजी रेडकर, महिला उपतालुकाप्रमुख साधना कळंगुटकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक यांचा समावेश आहे.
यावेळी श्री. परब यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “मळेवाड जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीत भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच सर्वांनी तयारीला लागावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण (बबन) राणे, परिक्षीत मांजरेकर, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.