मुंबईसह राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा.

मुंबईसह राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा.

पुणे.

   राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली असून मॉन्सून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापत आहे. विदर्भात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. तर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन दिवस कोकण गोव्यात, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
   राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मौसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र व महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन दिवसात उत्तर अरबी समुद्र व दक्षिण गुजरातच्या काही भागात तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. वातावरणाच्या मधल्या थरात मराठवाड्याच्या लगतच्या भागात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. १८ अंश उत्तर अक्षांशाजवळ वाऱ्याची द्रोणीका स्थिती वातावरणाच्या मधल्या थरात कायम आहे.
   आज व उद्या कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक ११ जून रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्र व उत्तर मराठवाडा वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.