देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे स्नेहसंमेलन उद्या

देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे स्नेहसंमेलन उद्या

 

सावंतवाडी 

 

      लोकमान्य ट्रस्टचे देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सावंतवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, १० जानेवारी रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत संवादचे सावंतवाडी प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव अॅड. संतोष सावंत, लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभु केळुसकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर, कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस आदी उपस्थित राहणार आहेत.

    या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण आणि सन्मान समारंभ यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॉलेजने विशेष तयारी केली असून, सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग उत्सुक आहेत.

       जनरल सेक्रेटरी सर्वेश नाईक व आदिती करंगुटकर यांनी सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या प्रतिभेचा विकास करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.