नाथ पै एकांकिका स्पर्धेचे ४८ वे वर्ष जाहीर!......वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित कोकणातील मानाची आणि परंपरावंत एकांकिका स्पर्धा

नाथ पै एकांकिका स्पर्धेचे ४८ वे वर्ष जाहीर!......वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित कोकणातील मानाची आणि परंपरावंत एकांकिका स्पर्धा

 

कणकवली 


       कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांच्या चिरंतन स्मृतीस अर्पण म्हणून वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धा यंदा आपल्या ४८ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
     सन १९७८ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेने अविरतपणे ४७ वर्षांचा प्रवास करत महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे. सर्वोत्तमतेचा ध्यास आणि वेगळेपणाची परंपरा जपत ही चळवळ आजही जोमाने सुरू आहे.
      ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वात जुनी व सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या मोजक्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. कणकवलीतील जाणकार रसिकांना दर्जेदार नाट्यप्रयोग पाहण्याची ही एक अप्रतिम संधी असते.


स्पर्धा दोन गटांत होणार आहे 
 खुला गट: प्रवेश फी ₹2000/-
 शालेय गट: प्रवेश फी ₹1000/-
पूर्ण भरलेला अर्ज सादर केल्यानंतरच संघाचा प्रवेश निश्चित करण्यात येईल.
फी QR Code द्वारे अदा करणे आवश्यक आहे.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: २ डिसेंबर २०२५


अधिक माहितीसाठी संपर्क 
श्री. शरद सावंत (कार्यवाह)
 9422584054


     “या मानाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून नाट्यचळवळ अधिक बळकट करा आणि नाथ पै एकांकिका स्पर्धा अधिक यशस्वी करा!” असे संस्थेने सर्व नाट्यप्रेमी व संघांना आवाहन केले आहे.