मुंबईत हायअलर्ट जारी; दहशतवादी हल्ल्याची भीती. मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात.

मुंबईत हायअलर्ट जारी; दहशतवादी हल्ल्याची भीती.  मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात.

मुंबई.

   देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मुंबई पोलिसांना दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे.
   मुंबईत दहशतवाद्यांचा हल्ला होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर हायअलर्टनंतर मुंबईतील गर्दीचे ठिकाण असतील किंवा मग धार्मिक स्थळ असतील, या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. प्रत्येक धार्मिक स्थळावर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. मुंबईमध्ये पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैणात करण्यात आलाय. शहरातील प्रत्येक बारीक हालचालीवरती पोलीस जे आहेत ते लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराबाहेरदेखील पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. भक्तांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्याशिवाय काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सिद्धिविनायक न्यासाचे सदा सरवणकर यांनी दिली.
   बमिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला असून पुन्हा एकदा मुंबईला दहशदवाद्यांकडून टार्गेट केलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अनेक लोक घराबाहेर पडतात. या निमित्ताने हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. तसेच आता हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आली आहे. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तपासणी केली जात आहे.