दाभोली इंग्लिश स्कूलच्या वतीने भारतीय नौसेना दिनानिमित्त रॅलीचे आयोजन.

दाभोली इंग्लिश स्कूलच्या वतीने भारतीय नौसेना दिनानिमित्त रॅलीचे आयोजन.

वेंगुर्ला.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे प्रथमच भारतीय नौसेना दिनानिमीत्त भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच विविध कार्यक्रम साजरा करण्याच्या निमित्ताने आपल्या सिंधुदुर्गा मध्ये भरताचेराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व मान्यवर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी तसेच या राष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त दाभोली हायस्कूलच्या वतीने व दाभोली तिठा रिक्षा मित्रमंडळ, ग्रामस्थ इत्यादी मान्यवर  उपस्थितीत दाभोली  तिठा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची स्वच्छता करुन रांगोळी काढून गावमध्ये रॅली काढण्यात आली.यावेळी
भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय नौसेना दिनाचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला. यामधे नागरिकांनी सहभागी होत घोषणा दिल्या.
 आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला सागरी किनारा व याचे रक्षण करणारी भारतीय नौसेना यांचा जय जय कार करत सिंधुदुर्गमध्ये हा राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित झाल्याबद्दल धन्यता व्यक्त करण्यात आली.
    यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर,  दाभोली रिक्षा मित्रमंडळचे नरेश बोवलेकर, श्री. मयेकर, दादा साळगावकर, बंड्या  माडकर, श्री. करंगुटकर, श्री कंदाळकर, सौ. रेशमा चोडणकर, वसंत पवार, दिपक पटिल, नितीन घोगले, व रिक्षा मित्रमंडळ पदधिकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उत्स्फूर्त उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.