कुडाळ येथे १५ मे रोजी फळभाज्या आणि अन्नपदार्थ प्रक्रिया प्रशिक्षण चे आयोजन

कुडाळ
कुडाळ येथे 15 मे रोजी फळ भाज्या आणि अन्नपदार्थ प्रक्रिया प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे एक बहुपयोगी प्रशिक्षण असून अनेक व्यवसाय संधी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. फूड सेक्टर मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध टेक्नॉलॉजीचा वापर करुन व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स कसे तयार करायचे आणि योग्य पद्धतीने ब्रँडिंग, पॅकेजिंग करुन त्यातून चांगला आर्थिक नफा, उत्पन्न कसे मिळवायचे याची विस्तृत माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण खूपच महत्त्वाचे आणि वैशिष्टपूर्ण ठरणार असून याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आपण या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यास उत्सुक असाल तर Registration करून आपली सीट बुक करू शकता. राहण्याची सोय हवी असल्यास तसे आधी कळवावे. कर्नाटक, गोव्यापासून पार धुळे, नगर, अकोला, पुणे, मुंबई या जिल्ह्यातील अनेक जण या प्रशिक्षणासाठी येणार असल्याने वेळेवर पूर्व नोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी Registration असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा. असे टीम अभिनव यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.