राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजू परब यांची निवड

राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजू परब यांची निवड


सिंधुदुर्ग

 

       राष्ट्रीय कर्मचारी सेना, एस.टी. युनियनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सच्चिदानंद उर्फ संजू परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष पंकज वालावलकर यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. या नियुक्तीबद्दल संजू परब यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संघटना वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करावे तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांना या निवडीच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.