सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर

सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर

 

सावंतवाडी

 

         जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सावंतवाडी तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, तहसिलदार श्रीधर पाटील, नायब तहसीलदार श्रीम. सविता कासकर तारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण प्रक्रिया पार पडली.यावेळी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार सावंतवाडी तालुक्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्ग २, अनुसूचित जाती २, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ८, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुले ९, सर्वसाधारण महिला २१ तर सर्वसाधारण २१ जागांसाठी सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले.


यात अनुसूचित जाती (अ.जा.) महिला प्रवर्गासाठी कलंबिस्त, सोनुर्ली गावांमध्ये आरक्षण पडले असून अनुसूचित जातीसाठी कुणकेरी व तिरोडा ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

तर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात इतर मागासवर्गासाठी (ना.मा.प्र.महिला) प्रवर्गासाठी दांडेली, आंबेगाव, चौकुळ, कास, आरोंस, सरमळे, कवठणी, निगुडे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुले आरक्षण

नाणोस, सातार्डा, कोलगांव, वेत्ये, माजगांव, असनिये, केसरी फणसवडे, पडवे माजगांव, मळगांव या ग्रामपंचायतींसाठी जाहीर करण्यात आले आहे.

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी इन्सुली, आंबोली, मळेवाड, नेमळे, सांगेली, ओटवणे, न्हावेली, शिरशिंगे, मडुरा, तळवणे, डिंगणे, डेगवे, वाफोली, विळवडे, देवसू दाणोली, भालावल, ओवळीये, गुळदूवे, पारपोली, किनळे व गेळे ग्रामपंचायत साठी आरक्षण जाहीर झाले आहे.

तर उर्वरीत बांदा, तळवडे, आरोंदा, कारिवडे, माडखोल, चराठे, निरवडे, आजगाव, शेर्ले, तांबोळी, वेर्ले, सातुळी बावळाट, भोमवाडी, सावरवाड, सातोसे, धाकोरे, नेतर्डे, पाडलोस, साटेली तर्फ सातार्डा, रोणापाल व कोनशी दाभिळ येथे सर्वसाधारण गटासाठी खुले आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.