'पवित्र रिश्ता' फेम प्रिया मराठे यांचे निधन

'पवित्र रिश्ता' फेम प्रिया मराठे यांचे निधन

 

मुंबई

 

    छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिच निधन झाल आहे. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी तिचे निधन झाले. ती अवघ्या 38 वर्षांची होती. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर तिची प्राणज्योत मालवली.प्रिया मराठे ही मध्यंतरी कर्करोगातून बरीही झाली होती. तिने यानंतर परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोगाने पुन्हा डोकेवर काढले होते. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे तिचे दुर्दैवी निधन झाले आहे.प्रिया मराठे हिने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून हिंदी मनोरंजनविश्वातही स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. 'कसम से', 'बडे अच्छे लगते है', या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केले होते.  याशिवाय, 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी' या मराठी मालिकांमध्येही तिने काम केले होते. मराठी मालिका विश्वात प्रिया मराठे हिचा चेहरा सर्वांच्या ओळखीचा होता. तिच्या निधनाने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.