महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अर्ज भरण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अर्ज भरण्यास मुदतवाढ

 

सिंधुदुर्गनगरी

 

        महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 ही रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 अशी होती. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे अनेक परीक्षार्थींना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी आल्या. त्यामुळे उमेदवारांना दि. 4 ते 9 ऑक्टोबर 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.तसेच, तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा शुल्क भरता न आलेल्या उमेदवारांसाठी नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड द्वारे दि. 9 ऑक्टोबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत शुल्क भरता येईल.यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरण्यास किंवा शुल्क भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही, अशी स्पष्ट सूचना राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आली आहे.परीक्षार्थींनी ही मुदतवाढ लक्षात घेऊन तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.