पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी ई केवायसी आणि आधार सिडींग करणे अनिर्वाय .

कणकवली.
पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी आणि आधार सिडींग करणे अनिर्वाय आहे. वारंवार सांगूनही कणकवली तालुक्यात जवळपास २२७५ शेतक-यांनी अद्यापही केवासी व आधार संलग्न बँक खाते लिंक केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील या शेतक-यांची नावे सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतक-यांनो आता ईकेवायसी व आधार सिडींग करणे बंधनकारक आहे. अन्यथा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून मुकावे लागणार आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करणा-या शेतक-यांना केंद्र शासनाकडून मागिल दोन वर्षापासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दोन हजार रुपये प्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ शेतक-यांना अनुदान स्वरुपात देण्यात येतो. याचा फायदा तालूक्यातील २१४५० शेतक-यांना होत आहे या योजनेला मिळणारा प्रतिसाद व शेतकर-यांमध्ये दिसुन येणार समाधान पाहता राज्य शासनाकडुनही मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतक-यांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्साठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे. तालुक्यातील २१४५० शेतक-यांना आता केंद्राप्रमाणेच राज्यशासनाचे दोन हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
०५ ऑक्टोबर पर्यंत करा केवायसी आणि आधार सिडिंग -
- कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार २६ सप्टेंबर पर्यंत तालूक्यातील २५०३ शेतक-यांची जवळपास आधार सिडींग बाकी आहे. शेतक-यांनी ०५ ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे अन्यथा सहा हजार रुपयांचा पुढिल हप्ता मिळणार नाही.
शेतक-यांनो अशी करा ई-केवायसी :-
- ई- केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेर्टिक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत
-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या वेबसाईटवर फार्मर कॉर्नर या टेबलमध्ये किंवा पीएम किसान अॅप वर ओटिपी द्वरे लाभार्थ्यांना स्वत: ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.
-गाहक सेवा केंद्रावर केवायसी प्रमाणीकरण बायोमेट्रिक पध्दतीने करता येईल.
असे करा आधार सिडिंग :-
- आपले बँक खाते संलग्न करण्यासाठी आपले बँक खाते आधार सिडिंग करुन त्यांना सदर खाते DBT Enable करणेसाठी सांगावे.
- पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन IPPB खाते खोलून तेथे DBT Enable करण्यास सांगावे. याकरितातालुका कृषि अधिकारी, कणकवली अधिक माहितीसाठी आपले गावातील कृषि सहाय्यक यांच्याशी तसेच ८००७४१५७९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात येत आहे.