वैभववाडी तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के

वैभववाडी
दहावी शालांत परीक्षेत वैभववाडी तालुक्याचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचा अथर्व जयवंत मोरे ९५.६० टक्के व ऋग्वेद मंदार विजापुरे ९५.६० टक्के गुण मिळवत हे दोघे तालुक्यात प्रथम आले आहेत. तर अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीची कु. अनुष्का तानाजी कांबळे हीने ९४.४० टक्के कोकिसरेचा कु. भुपाल महेश रावराणे याने ९३.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, अभिनय विद्यामंदिर सोनाळीची श्रुती दीपक पाटील हीने ९४.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर माधवराव पवार विद्यालय मिळवत चौथा क्रमांक पटकावला आहे. तालुक्यातील १८ माध्यमिक विद्यालयातून ३२६ मुले तर २०८ मुली असे एकूण ४४४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.