कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपणासाठी अनुदान योजनेसाठी २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपणासाठी अनुदान योजनेसाठी २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यासाठी कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपणासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यीनी www.mahamesh.org  या संकेतस्थळावर 26 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे, आवाहन  जिल्हा पशुसवर्धन उपआयुक्त डॉ. जे. एन. खरे यांनी केले आहे.
   राज्याच्या ग्रामीण भागात कुक्कुट पालन हा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र स्त्रोत म्हणून पुढे येत आहे. पारंपारिक कुक्कुट पालन पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देणे, लाभार्थी कौशल विकास करणे, पक्षी व्यवस्थापणा मध्ये सुधारणा करणे व त्यानुसार आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी  जिल्हयामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने भटक्या-क या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीच्या लाभार्थीकरिता 75 टक्के अनुदानावर चार आठवडे सुधारीत देशी प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनाकरीता अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. यायोजनेसाठी प्रती लाभार्थी एकूण प्रकल्प किमत रुपये 12000 असून 75 टक्के शासन अनुदान रुपये 9000 व लाभार्थी हिस्सा रुपये 3000 इतका आहे.
   यायोजने करीता इच्छुकांनी दिनांक 26 सप्टेंबर पर्यन्त अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपर्क करावा.