मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथील उड्डाणपुलाचे उद्या लोकार्पण

सावंतवाडी
मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण उद्या १३ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.गेली दोन वर्षे उड्डाणपुलाचे काम सुरु होते. उड्डानपुल पूर्ण झाल्याने शहरातील चौकात होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे तसेच अपघातांची मालिका देखील थांबणार आहे. दोन वर्षात या उड्डाणपूलाचे काम पूर्णत्वास आले आहे. यावेळी कार्यक्रमासाठी विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.