वैभववाडी तालुका विकास मंच तर्फे तालुकास्तरीय घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन. वैभववाडी तालुका स्थानिक संपर्क अध्यक्ष नवलराज काळे यांनी दिली माहिती.

वैभववाडी तालुका विकास मंच तर्फे तालुकास्तरीय घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन.  वैभववाडी तालुका स्थानिक संपर्क अध्यक्ष नवलराज काळे यांनी दिली माहिती.

वैभववाडी.

  वैभववाडी तालुका विकास मंच संस्थेच्या माध्यमातून "भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धा - २०२४" आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धा फक्त वैभववाडी तालुकास्तरीय असणार आहे. अशी माहिती स्थानिक संपर्क अध्यक्ष नवलराज काळे यांनी दिली. तालुक्यातील गणेश भक्तांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहान देखील करण्यात आले.
   स्पर्धेचे बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार.स्पर्धेचे प्रथम क्रमांक : २००१/- ट्रॉफी + सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक : १५०१/- ट्रॉफी + सन्मानपत्र, तृतीय क्रमांक : १००१/- ट्रॉफी + सन्मानपत्र आणि २ उत्तेजनार्थ ट्रॉफी + सन्मानपत्र  तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
   श्री गणेश सजावट स्पर्धेसाठी 10 ते 17 सप्टेंबरपर्यंत सहभागी होता येईल. स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वगळून इतर सहभागी होऊ शकतात. गणेश मूर्ती शाडू माती, पर्यावरणपूरक इको फ्रेंडली असणे आवश्यक आहे. गणेश मूर्तीच्या ठिकाणी देखावे, चित्र यामध्ये नैसर्गिकता, पर्यावरणाचा उपयोग केलेला असावा. नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी आपल्या घरगुती गणपतीचा सजावटीसहित फोटो आणि  एक व्हिडिओ खालील WhatsApp नंबरवर, स्पर्धकाचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सोबत पाठवावे.
   स्पर्धेच्या नियम आणि अटी खालीलप्रमाणे. १) सदर स्पर्धेसाठी कोणती ही प्रवेश फी नाही. २) सर्व सहभागी स्पर्धकांसाठी परिक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. त्यात बदल होणार नाही. ३) स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार "स्पर्धा समितीकडे" असणार आहेत.
नाव नोंदणीसाठी संपर्क करा. विठ्ठल तळेकर - 8879050769, सुरेश पाटील - 9137903740, विठ्ठल मासये - 8879476044, चंद्रकांत रासम - 9920738510, श्रीकृष्ण सोनार - 9619034824, नवलराज काळे - 9307327434, योगेश आंब्रसकर - 9930939636 यांच्याशी संपर्क साधावा.
   तालुक्यातील जास्तीत जास्त गणेश भक्तांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन वैभववाडी तालुका विकास मंच संस्थेच्या वतीने स्थानिक वैभववाडी संपर्क अध्यक्ष नवलराज काळे यांनी केले आहे.