माजी खासदार निलेश राणे यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा.

माजी खासदार निलेश राणे यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा.

मुंबई.

   लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असल्याने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून बाजूला होत निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. राजकारणात मन रमत नसल्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं आहे. सोशल मीडिया वर पोस्ट शेयर करत भावना व्यक्त केल्या आहे.शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गेल्या १९ ते २० वर्षात आपण सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे. कारण नसताना अनेकांनी साथ दिल्याबद्दल मी आभारी आहे. भाजपात काम करण्याची संधी मिळाली, त्यासाठी देखील मी पक्षसंघटनेचा आभारी आहे. परंतु आता राजकारणात मन रमत नसल्याने मी त्यातून निवृत्ती घेत असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.निवृत्तीमागे खास असं कोणतंही कारण नसल्याचं देखील निलेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता भाजपला कोकणात मोठा राजकीय धक्का बसला आहे. निलेश राणे हे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एकवेळा खासदार राहिलेले आहेत.