बेकायदा दारू वाहतुकीवर कुडाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १३ लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

बेकायदा दारू वाहतुकीवर कुडाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १३ लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

कुडाळ.

   राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने बांदा-दाणोली मार्गावर सातोळी येथे सापळा रचून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत मोटार तसेच दुचाकीसह एकूण १३ लाख २१ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मयूर रवींद्र माने, विनोद विठ्ठल माने (दोघे रा. मानेमळा येळावी, ता. तासगाव, जि. सांगली), सुशांत अशोक गायकवाडी (रा. वेताळबा जवळ, बसतोडे, ता. तासगाव, जि. सांगली) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.मोटार (एमएच ११ एडब्लू ८४६९) आणि या मोटारीला दिशा दाखवणारी दुचाकी (एमएच १० डीएफ २६४९) गोव्यातून-कोल्हापूरच्या दिशेने जात होती. पथकाने तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रॅन्डचे बॉक्स व मद्याने भरलेले प्लास्टिक कॅन आढळले. या कारवाईत ३,६१,७६० किंमतीची गोवा बनावटीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनासह एकूण १३,२१,७६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सिंधुदुर्ग अधीक्षक व्ही. व्ही वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कुडाळ निरीक्षक ए. ए. पाडळकर, सहायक दुय्यम निरीक्षक आर. डी. ठाकूर, जवान एस. एम. कदम यांनी केली. अधिक तपास निरीक्षक ए. ए. पाडळकर करत आहेत.