पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये विवेक मोरे विजेता.

पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये विवेक मोरे विजेता.

रत्नागिरी.

  रत्नागिरी येथे झालेल्या पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद मिळाला.सर्वाधिक लांबीच्या २१ किलोमीटर स्पर्धेत विवेक मोरे विजेता ठरला. ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि परदेशी नागरिकांनीही स्पर्धेत सहभाग घेऊन आगळेवेगळे रंग भरले.
  धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न आज सत्यात उतरले. सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी झुंबा डान्सने वॉर्म अपला सुरवात झाली. गुलाबी थंडी, नदी, दऱ्या, झाडी आणि खाडीकिनाऱ्यावरून निसर्गरम्य वातावरणात निघालेली कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धा अविस्मरणीय ठरली. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी तब्बल १५०० स्पर्धकांनी ५, १० आणि २१ किलोमीटरचे अंतर कापले. मार्गावरील सर्व गावांमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे वाजवून या धावपटूंचे जल्लोषात स्वागत केले. सर्वाधिक २१ किमीचे अंतर फक्त १ तास १० मिनिटांत कापून याने विवेक मोरे याने हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  रविवारी पहाटे ५ वाजल्यापासून थिबा पॅलेसजवळ झुंबा डान्स व वॉर्म अप सुरू झाला. त्यानंतर मथुरा हॉटेल येथून ६ वाजता शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू ऐश्वर्या सावंत, संपदा धोपटकर आणि वीरमाता श्रीमती ज्योती राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून २१ किमी स्पर्धेचे उद्घाटन झाले.
   हॉटेल मथुरा येथून २१ किलोमीटरसाठी धावपटू प्रचंड वेगाने धावू लागले. नाचणे, शांतीनगर, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप या मार्गावरून येताना सपाटी, चढाव, उतार यावरून पुढे निघाले. वाटेत विविध ठिकाणी ग्रामपंचायतींनी हायड्रेशन पॉइंटची व्यवस्था केली होती. १० किमीसाठी ६.१५ वाजता झेंडा दाखवला गेला आणि नाचणे, शांतीनगर व वळसा मारून त्याच मार्गाने मारुती मंदिर मार्गे धावपटू भाट्ये येथे पोहोचले. ५ किमीची स्पर्धा ६.५० वाजता सुरू झाली. त्यात सहभागी धावपटू मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत पोहोचले. भाट्ये येथे समुद्रकिनाऱ्यावर सांगता समारंभ झाला. यावेळी स्पर्धकांच्या तोंडून वॉव, अप्रतिम, वंडरफुल असे उत्स्फूर्त शब्द ऐकायला मिळाले.
  स्पर्धेचा गटनिहाय गुणानुक्रमे निकाल असा - २१ किमी- १६ ते ३५ वयोगट - पुरुष- विवेक मोरे, सिद्धेश बारजे, विशाल कंबिरे, जगदीश सिंह, नीलेश कुळ्ये, अनिकेत कुटरे, महिला- आकांक्षा शेलार, प्रमिला पाटील, रोहिणी पाटील, सीमा राठोड, निशा कुडले, अमिशा मांजरेकर. ३६ ते ४५ वयोगट- पुरुष- प्रसाद आलेकर, सागर घोले, डॉ. तेजानंद गणपत्ये. महिला- लथा रविचंदर, विभावरी सप्रे, कविता जाधव. ४६ ते ५५ वयोगट- पुरुष- गुरुमूर्ती नायक, अनंत तानकर, नितीन करंजकर. महिला- विजया भट, स्वाती संघवी, लिलानवर चौहान. ५६ ते ६५ वयोगट- पुरुष- अलेक्स कोइलहो, सुरेश वेलणकर, जितेंद्र सुर्वे. महिला- कोरिना डॅम, क्रांती साळवी, नीलम वानरसे. ६५ वर्षांवरील गट- पुरुष हेमंत भागवत, अनंत क्षीरसागर, कॅप्टन प्रमोद साळवी. महिला- किशोरी कुडेचा.
   १० किमी- १६ ते ३५ वयोगट- पुरुष- अमेय धुळप, अभिनय घुरे, आदित्य धुळप, तुषार लोंढे. महिला- हेमांगी देसाई, कामिनी कार्लेकर, युगंधरा मांडवकर, रेणुका कांबळे. ३६ ते ४५ वयोगट- पुरुष- चैतन्य उप्पीन, साजिद शेख, धनंजय रूपनर. महिला- मनस्वी गुडेकर, सोनाली खानविलकर, संपदा खातू. ४६ ते ५५ वयोगट- पुरुष- सुहास आंबेले, संतोष महाकाळ, प्रशांत दाभोळकर, केवल बारगोडे. महिला निशिगंधा नवरे, सायली निकम, धनश्री जोशी. ५६ ते ६५ वयोगट- पुरुष- प्रवीण कुलकर्णी, काशिनाथ पाटील, नवीन जोशी. महिला- अनिता पारेख, विद्या चव्हाण, शिल्पा बन्साली, ६५ वर्षांवरील गट- पुरुष- सतीश दीपनिक, चंद्रकांत धुरी, जयंत माजिरे. महिला- दक्षा कन्विय.५ किमी- १६ ते ३५ वयोगट पुरुष यश शिर्के, श्रेय मांडवकर, संदेश सोरटे. महिला- शिवानी मासये, साक्षी पांचाळ, दीपाली भोजे. ३६ ते ४५ वयोगट- पुरुष- रणजित पवार, सचिन चौगुले, राजकमल उपाध्याय. महिला- नीलम ओसवाल, शुभांगी तहसीलदार, रिता संत्रा. ४६ ते ५५ वयोगट- पुरुष- बरून संत्रा, योगेश गंगावणे, विश्वास जाधव. महिला- मानसी मराठे, सत्या यादव, रश्मी सावंत.५६ ते ६५ वयोगट- पुरुष- नारायण पाटाळे, प्रतापसिंग शिर्के, पूर्णसिंग मेहरा. महिला- वीणा गोगटे, सुनीता फुटाणे, सुषमा राणे. ६५ वर्षांवरील वयोगट- पुरुष- गजानन भातडे, अशोक काटकर, अविनाश भाटकर. महिला- प्रतिभा मराठे, शुभांगी देवरूखकर, सविता काटकर.
स्पर्धेत आगळेवेगळे स्पर्धकही सहभागी झाले होते. खेडमधील दिव्यांग सुरेश विलणकर यांनी २१ किमी अंतर कापले. नेदरलँड येथील महिला कोकी वॅन डॅम यांनीही मॅरथॉन पूर्ण केली. रत्नागिरीतील ७१ वर्षीय प्रतिभा मराठे यांनी साडी नेसून ५ किमीची स्पर्धा पूर्ण करत गटात प्रथम क्रमांक मिळवला. रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी व्हीलचेअरवरून स्पर्धा पूर्ण केली. कर्नाटक येथील ५ वर्षीय लहान मुलाने स्पर्धा पूर्ण करून कौतुकाची थाप मिळवली.
  स्पर्धेत परदेशी महिला नागरिकही सहभागी झाले होते. साडी नेसून धावणाऱ्या मराठे आजी गटात प्रथम आल्या. स्पर्धेत ७ ते ८८ वयोगटातील धावपटूंचा सहभाग होता. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णीसुद्धा २१ किमी अंतर धावले. रत्नागिरी जिल्हा पर्यटन प्रसिद्धीसाठी गणपतीपुळे, कर्णेश्वर मंदिराचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते. सेल्फी पॉइंट, धावनगरी रत्नागिरीजवळ फोटो काढण्यास मोठी गर्दी झाली. एम फिटनेस आणि फिटनेस मंत्राच्या माध्यमातून झुंबा डान्सने स्पर्धेला प्रारंभ झाला. सर्व ग्रामपंचायतींनी हायड्रेशन पॉइंटची व्यवस्था केली होती.
   या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील वर्षीची मॅरेथॉन ५ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याचे यावेळी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी जाहीर केले.
   सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रफुल्ल सप्रे, श्रीमती विजया राणे, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी, डॉ. नितीन सनगर, महेश सावंत, एनसीसी कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, ब्रूक्स, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, एमआर असोशिएशन, जिल्हा पोलीस, वाहतूक पोलीस, जिल्हा शासकीय रुग्णालय, रुग्णवाहिका, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, आरोही फिजिओथेरपी, सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. फोटोग्राफर ओम पाडाळकर व सहकारी आदित्य दशवंतराव, यश सावर्डेकर, साईराज टिकेकर, इम्रान डांगे, गणेश दुबल, ज्ञानेश कांबळे, अनुपम तिवारी, ओंकार कदम, श्वेता बेंद्रे, कौस्तुभ वायंगणकर, सचिन सावंत, प्रसाद शिवगण, ओंकार भालेकर, मयूर पाडळकर यांनी फोटोग्राफी केली.